अफगाणिस्तानमध्ये एका भारतीय नागरिकासह तिघांचे अपहरण करून हत्या

काबूल : रायगड माझा वृत्त 

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये दहशतवाद्यांनी एका भारतीय नागरिकासह तिघांचे अपहरण करून त्यांची हत्या केली. ज्या तिघांची हत्या करण्यात आली आहे ते सर्व जण एका आंतरराष्ट्रीय फुड कंपनीत काम करत होते. अफगाणिस्तानमधील सुरक्षा अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

काबूलमधील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी फूट आणि कॅटरिंग कंपनीत काम करणाऱ्या तिघा कर्मचाऱ्यांचे प्रथम अपहरण करण्यात आले त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. हत्या झालेल्यांमध्ये एक भारतीय, एक मलेशियन आणि एक मॅसिडोनियाचा नागरिक आहे.

या तिघांच्या मृतदेहाजवळ ओळखपत्र सापडल्यामुळे त्यांची ओळख पटली. या कामगारांची हत्या का करण्यात आली किंवा त्यामागे कोणता दहशतवादी गट आहे हे अद्याप समजू शकले नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत