अभिनंदन दुपारी 4 वाजेपर्यंत मायदेशी परतणार

नवी दिल्ली : रायगड माझा ऑनलाईन 

 

भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना अखेर भारताकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. आज वाघा बार्डरवरून अभिनंदन वर्तमान भारतीय वायू दलाचे अधिकारी जेडी कुरियन यांच्यासोबत भारतात परतणार आहेत. पण यावेळी वाघा बॉर्डवर होणारा ‘बीटिंग द रिट्रीट’ हा कार्यक्रम रद्द करण्यात येणार आहे.

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, विंग कमांडर अभिनंदन हे 4 वाजताच्या सुमारास मायदेशी परतण्याची शक्यता आहे. त्यावेळी वाघा बॉर्डवर ‘बीटिंग द रिट्रीट’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. पण सुरक्षेच्या दृष्टीने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही नागरिकांना यावेळी वाघा बॉर्डरवर जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

दरम्यान, अभिनंदन यांना भारतात आणण्यासाठी सगळ्या महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता पूर्ण करण्यात आली आहे. दुपारनंतर अभिनंदन भारतात परतणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्याचबरोबर आपल्या मुलाला आणि देशाच्या या वीरपुत्राला पाहण्यासाठी अभिनंदनचे आई-वडील अमृतसरला दाखल झाले असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत