अभिनंदन शब्दाचा अर्थच आता बदलला आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान अखेर शुक्रवारी रात्री भारतात परतले आहेत. अभिनंदन हे जवळपास तीन दिवस पाकिस्तानच्या कैदेत होते. त्यांच्या सुखरुप वापसीचा देशभरात जल्लोष सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. पंतप्रधान मोदींनी शनिवारी एका कार्यक्रमादरम्यान अभिनंदन यांच्या धाडसाचे जाहीर कौतुक केले.

‘भारत देश जे काही करतो, त्याकडे जग गांभीर्यानं पाहत असतं. शब्दकोशातील शब्दांचा अर्थ बदलण्याची ताकद या देशात आहे. कधी काळी ‘अभिनंदन’ या शब्दाचा अर्थ ‘Congratulation’ असा होता, मात्र आता ‘अभिनंदन’चा अर्थ बदलला आहे’, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी अप्रत्यक्षरित्या पाकिस्तानला ठणकावून सांगितले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत