अभिनेता आदिनाथ कोठारे ठरला सायबर क्राईमचा बळी

मुंबई : रायगड माझा वृत्त 

दिग्दर्शक महेश कोठारेंचा मुलगा आणि अभिनेता निर्माता आदिनाथ कोठारे ह्याने अज्ञात व्यक्तिविरोधात समता नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केलाय. सादर व्यक्तीने आदिनाथच्या नावाने खोटा ई मेल आयडी  तयार करून त्याच्या काही मित्र मैत्रिणी आणि होतकरू माॅडेल्सना मेल केलेत.  त्यांना आगामी सिनेमाच्या कास्टिंगसाठी लोणावळ्याला ये असे मेसेजही पाठवले. मात्र ह्याची शहानिशा करण्यासाठी जेव्हा काही जणांनी आदिनाथला फोन केला. तेव्हा या बाबींचा उलगडा झाला. या प्रकरणी पोलीस सायबर क्राईम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून घेत आहेत.

योगायोग बघा, आदिनाथचा टेक केअर गुड नाईट हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झालाय. तो सायबर गुन्ह्यावरच बेतलाय. सिनेमाचे लेखक-दिग्दर्शक गिरीश जोशी सांगतात, ही एक सत्यकथा आहे. त्यांच्या एका नातेवाईकच्या बाबतीत जो प्रसंग त्यांच्या वयाच्या ५०व्या वर्षी  घडला. हे नातेवाईक काही काळासाठी परदेशात असतात. परत आल्यावर त्यांच्या लक्षात येते की, त्यांचे काही लाख रुपये हे त्यांच्या क्रेडीट कार्डावरून ऑनलाइन काढले गेले आहे. ‘अत्यंत हतबल झालेल्या या नातेवाईकांनी मग मला मदतीसाठी दूरध्वनी केला. मी मग त्यांना तक्रार नोंदविण्यासाठी सायबर सेल विभागात घेऊन गेलो. त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांशी झालेल्या संभाषणामध्ये मला माझ्या काकांच्या बाबतीत घडलेल्या त्या घोटाळ्याबाबत आणखी माहिती मिळत गेली. पण त्याचवेळी संपूर्ण जगात या अशा घोटाळ्यांचे प्रमाण किती मोठे आहे, हे ध्यानात आले.’

हा चित्रपट 31 आॅगस्टला रिलीज होतोय. यात महेश मांजरेकर पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आहे. तर सचिन खेडेकर वडिलांच्या. तगड्या कलाकारांचा हा रहस्यपट नक्कीच अपेक्षा ठेवतो.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत