अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी

रायगड माझा

पंजाबमधील कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याने बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. बिष्णोई याने ही धमकी का दिली, याबाबत माहिती मिळू शकली नाही.
लॉरेन्स बिष्णोई याच्यावर हत्येचा प्रयत्न, खंडणी व बेकायदा शस्त्रास्त्र बाळगणे अशा प्रकारचे २०हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर एका उद्योगपतीच्या हत्येचाही आरोप असून याच प्रकरणात त्याला शुक्रवारी जोधपूर जिल्हा न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्याने सलमानला मारण्याची धमकी दिली. यामध्ये तो, सलमानला मी जोधपूरमध्येच संपवणार, असे म्हणाला असल्याने या धमकीचा संबंध काळवीट शिकार प्रकरणाशी जोडला जात आहे. जोधपूर पोलिसांनी बिष्णोईच्या धमकीची गंभीर दखल घेतली असून सलमान खानला आवश्यक तेव्हा पुरेशी सुरक्षा पुरविली जाईल, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत