अभिनेते दिलीप कुमार यांची तब्‍येत बिघडली, फुफ्‍फुसांत इन्‍फेक्‍शन झाल्‍याचे वृत्त

मुंबई :रायगड माझा ऑनलाईन 

गेल्‍या काही महिन्‍यांपासून अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती खराब आहे. काही दिवसांपूर्वी त्‍यांना हॉस्‍पिटलमध्‍ये दाखल केलं होतं. आता पुन्‍हा त्‍यांची प्रकृती बिघडली असल्‍याचे वृत्त आहे. दिलीप कुमार यांना ताप असून त्‍यांच्‍या फुफ्‍फुसांत इन्‍फेक्‍शन झाल्‍याचे समजते. एका वेबसाइटने दिलेल्‍या माहितीनुसार, एक मेडिकल टीम दिलीप यांच्‍या घरी त्‍यांच्‍यावर उपचार करत असल्‍याचे म्‍हटले आहे.

Image result for dilip kumar
दिलीप कुमार सध्‍या घरी असून त्‍यांना नळीवाटे अन्‍न, पाणी दिले जात आहे. तोंडावाटे त्‍यांना अन्‍न-पाणी दिलं जाऊ शकत नसल्‍याचे डॉक्‍टर्सचे म्‍हणणे आहे. गेल्‍यावेळी त्‍यांना निमोनिया झाल्‍याने लीलावती हॉस्‍पिटलमध्‍ये दाखल करण्‍यात आलं होतं.

अनेक दिवस अतिदक्षता विभागात उपचार झाल्‍यानंतर दिलीप कुमार यांना डिस्‍चार्ज करण्‍यात आलं होतं. दिलीपजी यांच्‍या प्रकृतीबद्‍दल त्‍यांच्‍या पत्‍नी आणि अभिनेत्री सायरा बानो नेहमीच सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून अपडेट देत असतात.

मध्‍यंतरी, दिग्‍दर्शक सुभाष घई म्‍हणाले होते, ‘दिलीप यांना पाहून मी दुखी होतो.  दिलीप कुमार सुपरस्टार आहेत. त्‍यांनी आपल्‍या करिअरची सुरुवात १९४४ मध्‍ये ‘ज्वार भाटा’ या चित्रपटातून केली होती.’

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत