अभिनेत्री पूनम पांडे हिला बलात्कार आणि अ‍ॅसिड हल्ल्याच्या धमकीचे फोन

मुंबई: महाराष्ट्र News 24 वृत्त

हैदराबाद येथील डॉक्टर महिलेवर बलात्कार आणि त्यानंतर तिची जाळून हत्या करण्यात आली. या घटनेनं देश हादरला असतानाच, उन्नावमधील बलात्कारपीडितेला जाळण्याचा प्रयत्न झाला. या हल्ल्यात ती ९० ते ९५ टक्के भाजली होती. काल, शुक्रवारी रात्री उशिरा तिचा दिल्लीतील रुग्णालयात मृत्यू झाला.

Image result for अभिनेत्री पूनम पांडे"

एकीकडे हैदराबाद आणि उन्नावमधील घटनांनी देश हादरला असतानाच, बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे हिला बलात्कार आणि अ‍ॅसिड हल्ल्याच्या धमकीचे फोन येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पूनम पांडेनं स्वतः ट्विट करून सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. या ट्विटमध्ये तिनं मुंबई पोलीस, मुख्यमंत्री कार्यालय आणि गुगललाही टॅग करून मदत मागितली आहे.

या घटनांचा देशभरात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. देशातील महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिलांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त होत असतानाच, अभिनेत्री पूनम पांडे हिनं मला बलात्कार आणि अ‍ॅसिड हल्ल्याच्या धमक्या येत असल्याचं म्हटलं आहे. यासंबंधी तिनं ट्विट केलं आहे. त्यात मुंबई पोलीस, गुगल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही टॅग केलं आहे. ‘माझा मोबाइल क्रमांक एका अॅपवरून शेअर करण्यात आला आहे. याबाबत मी गुगलकडे वारंवार तक्रार केली आहे. पण त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. मला बलात्कार आणि अ‍ॅसिड हल्ल्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. २४ तास मी दहशतीखाली असते. कृपया मला मदत करा’, असं तिनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. तुमचा संपर्क क्रमांक पाठवू शकता का? असं विचारत आम्ही या संदर्भात दखल घेतली आहे, असं ट्विट मुंबई पोलिसांनी केलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत