अभिनेत्री सोनम कपूर अडकली विवाहबंधनात

मुंबई : रायगड माझा 

बॉलिवूडची अभिनेत्री  सोनम कपूरने प्रियकर आनंद आहुजाबरोबर मंगळवारी लग्नगाठ बांधली. शिख पद्धतीने सोनम-आनंदचा विवाह सोहळा संपन्न झाला. सोनमच्या आनंद कारजचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आनंद कारज हे हिंदू धर्माच्या विवाहाच्या पद्धतीपासून पूर्णपणे वेगळे असते. आनंद कारजची रसम सकाळी होते. पारंपरिक हिंदू विवाहांमध्ये लग्न, मुहूर्त, जन्मपत्रिका मिळवणे गरजेचे असते पण आनंद कारजमध्ये याला विशेष महत्त्व नाही. शिख धर्मात जे लोक गुरूवर पूर्ण श्रद्धा ठेवतात, तेच आनंद कारज करतात. त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस पवित्र असतो.

सोनमच्या आनंद कारजचे विधी सकाळी ११ वाजता सुरू होऊन १२.३० पर्यंत चालले. लाल ओढणीच्या छायेमध्ये भाऊ हर्षवर्धन कपूर व अर्जुन कपूरने सोनमला विवाह मंडपापर्यंत आणले. या विवाह सोहळ्यातील अनिल कपूर आणि अन्य लोकांचे डान्स व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

म्हणून ऐश्वर्या लग्नाला राहिली गैरहजर
सोनमच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावण्यासाठी सेलिब्रिटींनीही गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी कपूर कुटुंबातीच प्रत्येक सदस्याच्या चेह-यावर एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. त्याशिवाय सोनमला शुभेच्छा देण्यासाठी बिग बी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि श्वेता नंदा-बच्चन यांनीही बॉलिवूडच्या अनेकांनी हजेरी लावली. पण, या गर्दीत ऐश्वर्या राय – बच्चन मात्र कुठेच दिसली नाही. त्यामुळे ती नेमकी का आली नसावी, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करून गेला. दहा वर्षापासून सोनम आणि ऐश्वर्यामध्ये एका ब्रँडमुळे झालेल्या वादाचेच हे पडसाद असल्याचे म्हटले जात आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत