अमन लॉज-माथेरान दरम्यान शटल सेवेचा 20मे रोजी मेगा ब्लॉक..

दुरुस्तीच्या कामासाठी दुपारी चार तास बंद ठेवली जाणार आहे शटल सेवा

माथेरान :अमन लॉज ते माथेरानया मार्गावर चालविण्यात  येणाऱ्या मिनीट्रेनच्या शटलसेवेचा  २० मे   रोजी  मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे . पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या माथेरानचा सध्या उन्हाळी पर्यटन हंगाम सुरु असून या  मेगा ब्लॉक मुले अनेक पर्यटकांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. माथेरान हे जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ  आहे. मोटारवाहनांना बंदी असणाऱ्या माथेरानमध्ये मोटार वाहनाने माथेरानला येणाऱ्या पर्यटकांना या शटल सेवेचा मोठा आधार आहे.
दरम्यान  20 मे रोजी दुपारी चार तास नॅरोगेज मार्गावरील दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवली जाणार आहे.दरम्यान,मिनिट्रेनच्या मार्गावर अमन लॉज ते माथेरान स्टेशन या 3 किलोमीटरच्या मार्गावर हा ब्लॉक असणार आहेत,या काळात शटल सेवा बंद असणार आहे,तसेच  माथेरान आणि नेरळ येथून सोडल्या जाणाऱ्या  मिनिट्रेनच्या एकेक  फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.
                  उद्या २० मे रोजी  नॅरोगेजच्या मार्गावर सकाळी 9.45 पासून दुपारी 1.45 पर्यत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.या काळात अमन लॉज स्टेशन ते माथेरान स्थानक या दरम्यान नॅरोगेज मार्गावर दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.त्या काळात नॅरोगेज मार्गावर रूळ बदलणे, सायडिंग ट्रॅक,लाकडी सिग्नल यंत्रणा,दोन्ही स्थानकातील किरकोळ कामे ही देखील मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग लावून केला जाणार आहे.त्यासाठी मध्य रेल्वेचा पीडब्लूआय विभाग नियोजन करीत आहेत.
या मेगाब्लॉक मुळे नेरळ-माथेरान या दरम्यान नेरळ येथून  सकाळी 8.50लामाथेरानला जाणारी मिनीट्रेनची फेरी रद्द करण्यात आली आहे.त्याचवेळी माथेरान येथून नेरळ कडे  जाणारी सकाळी ९वाजून 20 मिनिटांनी सोडली जाणारी मिनिट्रेनची एक फेरी रद्द करण्यात आली आहे. मात्र मेगाब्लॉकच्या काळात अमन लॉज ते माथेरान स्टेशन या दरम्यान चालविली जाणारी शटल गाडीच्या फेऱ्या चार तासाच्या काळात बंद राहतील असे मध्य रेल्वेच्या ऑपरेशन विभागाचे लाल कुमार यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत