अमरनाथ यात्रा: दरड कोसळून ५ ठार

 

रायगड माझा वृत्त

जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथच्या यात्रेदरम्यान बलाटल मार्गावरील ब्रारीमार्ग येथे मंगळवारी दरड कोसळली. या घटनेत ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर तिघं गंभीर जखमी झाले आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही अमरनाथची यात्रा २७ जूनला सुरू झाली. या यात्रेत देशातील २ लाख भाविक सहभागी झाले आहेत. अमरनाथला जाण्यासाठी यात्रेकरुंचा एक ताफा बलाटल मार्गे रवाना झाला. पण बलाटलला जाणाऱ्या रस्त्यावर अतिवृष्टी झाल्यामुळे या भाविकांना २८ जूनला बलाटल बेस कॅम्पलाच लष्कराकडून थांबवण्यात आलं होतं. याच परिसरात पाऊस थोडा कमी झाल्यावर अमरनाथच्या दिशेने निघालेल्या यात्रेकरुंच्या ताफ्यावर काल दरड कोसळली. दरम्यान बचाव पथक वेळीच जागी पोचले असून जखमींवर उपचार सुरु आहेत.

दहशतवाद्यांच्या वाढत्या कारवाया पाहता यंदा लष्कराने अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त केला आहे. अजूनतरी कुठलाही दहशतवादी हल्ला अमरनाथ यात्रेकरुंवर झालेला नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत