अमळनेरमध्ये हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; साई लॉजवर LCB ची धाड, 2 ताब्यात

अमळनेर:रायगड माझा 

धुळे रोडवरील बहुचर्चित साई लॉज देहविक्री होत असल्याची माहितीवरून जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखा (एलसीबी) व अमळनेर पोलिस पथकाने संयुक्त कारवाई केली आहे. त्यात व्यवस्थापक व मालक या दोघांवर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनुसार, दुपारी 2 वाजेच्या देहविक्रय व्यवसाय सुरु असल्याबाबत माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांना मिळाली होती. त्यानुसार कराळे व अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या आदेशावरून जळगाव गुन्हा अन्वेषण शाखा व अमळनेर पोलिस पथक यांनी संयुक्त छापा टाकला. बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता सदर लॉजवर देहविक्री व्यवसाय असल्याची खात्री पटली. नंतर छापा टाकण्यात आला. सदर लॉज व्यवस्थापक अंकुश दौलत पाटील (रा.मंगरूळ ता.अमळनेर) व लॉजमालक दिलीप टिल्लूमल ललवाणी (रा. न्यू प्लॉट, अमळनेर) यांच्याविरुद्ध अमळनेर पोलिसात स्त्रिया व मुलींचे अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा चे क्र. 3,4,5,6,व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर लॉजवर रोख रक्कम 11 हजार 810 रुपये व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईसाठी जिल्हा गुन्हा अन्वेषण पोलिस निरीक्षक सुनील कुऱ्हाडे, पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर, उपनिरीक्षक सुप्रिया देशमुख, सहाय्यक फौजदार मनोहर देशमुख, नीलकंठ पाटील, रवी गायकवाड, रामचंद्र बोरसे, नरेंद्र वारुळे, मिलिंद सोनवणे, रमेश चौधरी, सविता पाटील, वैशाली पाटील, गायत्री सोनवणे, वहिदा तडवी, यांच्यासह अमळनेर पथकातील किशोर पाटील, रवी पाटील, प्रमोद बागडे, संतोष पाटील, आदींचा सहभाग होता.

Next Article

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत