अमित ठाकरेंनी रेल्वे प्रशासनाची काढली खरडपट्टी

रायगड माझा वृत्त 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी आज मनसेच्या शिष्टमंडळासह रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली. यावेळी रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांविषयी सुस्त आणि निष्क्रिय झालेल्या प्रशासनाला त्यांनी जागं केलं.

गाड्यांची अनियमिततेपासून ते गाड्या अचानक रद्द होणे, फलाटांवरची अस्वच्छता ते महिला प्रवाशांची सुरक्षितता अशा अनेक विषयांवर त्यांनी मुंबईकरांचा आवाज आज अमित ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनाकडे पोहचवला. दर रविवारी मेगा ब्लॉक असतो, पावसाळ्यात सतत ट्रेनची राखडपट्टी होते यावर कायम तोडगा काढण्याची मागणी अमित ठाकरेंनी केली आहे. दरम्यान आपल्या मागण्यांवर रेल्वे अधिकाऱ्यांची उत्तरं ऐकून अमित राज ठाकरेंनी अधिकाऱ्यांपुढे डोकं टेकलं. अखेर रेल्वे अधिकाऱ्यांकडून अपेक्षित उत्तर अमित ठाकरेंना न मिळाल्याने मनसेच्या मागण्यांचं निवेदन दिलं. यावेळी अमित ठाकरे आणि मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत