अमित शाह यांचा उद्धव ठाकरेंना फोन, मराठा आरक्षणावर केली चर्चा; लवकरच दोघांमध्‍ये होणार बैठक

रायगड माझा वृत्त 

  • मुंबई- भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोन करून चर्चा केली. राज्यातील मराठा आरक्षणासाठी झालेले आंदोलन आणि त्यावरील उपाययोजनांबाबत त्यांच्यात चर्चा झाली. तसेच राज्यसभेच्या उपसभापतिपदासाठी पाठिंबा देण्याबाबतही बोलणे झाल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली. मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाबाबतही दोघांत चर्चा झाल्याचे सांगितले जाते. लवकरच शहा आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा भेटणार असून लोकसभा-विधानसभा निवडणुकांबाबत चर्चा करणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
  • विराेधकांकडून राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण उमेदवार?
    ९ ऑगस्टला राज्यसभा उपसभापतिपद निवडणूक आहे. विरोधी पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांचे नाव पुढे केले आहे, मात्र निवडीचे सर्वाधिकार काँग्रेसला दिले. एनडीएने जेडीयू खासदार हरिवंश यांना उमेदवारी दिली. भाजपला १२३ मतांची गरज आहे. मात्र, अकाली दलाचे ३ खासदार गैरहजर राहू शकतात. मित्रपक्षांच्या मदतीने भाजप ११५ मतांची जमवू शकतो, तरीही ८ मतांची गरज आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत