अमूलनेही घेतली राहुल- मोदींच्या मिठीची दखल

रायगड माझा वृत्त ।

लोकसभेत नेहमीच एकमेकांवर कुरकोढी करणारे नेते शुक्रवारी एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू असताना काँग्रेस नेते  राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली. अर्ध्या तासाच्या भाषणात राहुल यांनी मोदी, भाजप आणि आरएसएसवर जोरदार टीका केली. राहुल- मोदी यांची ही गळाभेट चांगलीच गाजली.

 

 

या भेटीनंतर सोशल मीडियावर तर हा विषय ट्रेण्ड करु लागला होता. शेवटी अमूलनेही याची दखल घेत या गळाभेटीवर एक कार्टुन तयार केले. आपल्या हटके कार्टुनसाठी अमूल आधीपासूनच प्रसिद्ध आहे. यात आता राहुल- मोदी यांच्या गळाभेटीचे कार्टुन सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यांचे हे कार्टुनही लोकांना फार आवडत असून मोठ्या प्रमाणात शेअरही केले जात आहे.

शुक्रवारी लोकसभेत राहुल गांधी यांचे भाषण संपताच ते थेट मोदींच्या दिशेने चालत गेले आणि त्यांना मिठी मारली. आपल्या जागी बसल्यानंतर राहुल यांनी डोळाही मारला. त्यांच्या या कृतीवर आक्षेप घेत अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी राहुल यांना त्यांचे हे वागणे योग्य नसल्याचे सुनावले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत