अमृत फार्माचे संचालक शैलेश जोशी यांची आत्महत्या

नवी दिल्ली : रायगड माझा

अमृत फार्माचे व्यवस्थापकीय संचालक शैलश जोशी (वय ४०, रा. विजय नगर, बेळगाव) यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास बेळगाव येथील त्यांच्या राहत्या घरी घडली.

बेळगावचे माजी नगराध्यक्ष शरद जोशी यांचे ते चिरंजीव होते. अमृत मलम, अमृत फार्मा आदी कंपनीचे ते संचालकही होते. स्वत:च्या रिव्हॉल्वरने त्यांनी छातीवर गोळी झाडली. गोळी झाडल्याचा मोठा आवाज आल्याने परिसरातील नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत