अमेरिकेला वादळाचा तडाखा; १४ जणांचा मृत्यू

अमेरिका : रायगड माझा वृत्त

अमेरिकेला पुन्हा एकदा टोर्नाडोचा (वादळ) तडाखा बसला आहे. मुख्यतः अमेरिकेतील दक्षिण पूर्व भागातील अलाबामा येथे वादळामुळे १४ जणांचा मृत्यू झाला. या शक्तिशाली वादळामुळे अनेक घरे उद्‌ध्वस्त झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी घरे कोसळली असून मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. अनेक व्यक्ती बेपत्ता आहेत.

वादळाने नुकसान झालेल्या अलाबामा राज्यात डझनभर आपत्कालीन बचावपथके पाठविण्यात आली आहेत. हे वादळ रविवारी दुपारी धडकले होते. या वादळामुळे जीवितहानी झाली आहेत. आतापर्यंत एकूण १४ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती ली काउंटी शेरिफ जे जोन्स यांनी दिली आहे. ली काउंटी भागात सुमारे ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत