अमोल कोल्हे यांचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई : रायगड माझा वृत्त 

शिवसेनेचे नेते आणि प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिवसेनेच्या स्टार प्रचारकांमधील महत्त्वाचा नेताच पक्षातून बाहेर पडल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वीच डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत डॉ. कोल्हे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला होता. आगामी लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीकडून शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार आहे. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत दोन माजी आमदारांनीही राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या मनगटावर बांधले आहे. मुंबईत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ.अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

अमोल कोल्हे यांच्यासह बदनापूरचे माजी आमदार अरविंद चव्हाण यांनीही भाजपा सोडून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला आहे. दरम्यान, यापूर्वी संभाजी ब्रिगेडचे प्रविण गायकवाड यांच्यासह अमोल कोल्हे यांनी बारामतीच्या गोंविंदबाग येथील निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे प्रविण गायकवाड यांना पुण्यातून आणि अमोल कोल्हे यांना शिरूर मधून उमेदवारी निश्चित होणार असल्याचे समजते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत