अयोध्यात बुद्ध मंदिरासाठीही जागा द्यावी – रामदास आठवले

पुणे : रायगड माझा वृत्त 

अयोध्येला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भेट दिली त्याचे मी स्वागत करतो. मी ही अयोध्येलाही जाणार आहे. तेथे राम मंदिर, मशिदीसाठी आणि बुद्ध मंदिरासाठी जागा द्यावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केली आहे.

अयोध्यात राम मंदिर व्हावे या मताचा मी आहे. सुप्रिम कोर्टाला निकाल निकाल राममंदिराच्या विरोधात नसणार आहे. तो निकल हिंदु मुस्लिमांना न्याय देणारा असावा असे सांगतानाच ती जागा ओरिजनल बुद्ध मंदिराची होती त्यामुळे तेथे बुद्ध मंदिरालाही जागा मिळावी असेही ते म्हणाले.

अयोध्येत राम मंदिर बांधताना मुस्लिमांनी, मशीद बांधताना हिंदुनी सहकार्य केला आहे. सहमतीने हा प्रश्‍न सुटला पाहिजे. अयोध्येतील राम मंदिर बेकायदेशी होता कामा नये. कोर्टाच्या निकालाचीही प्रतीक्षा केली पाहिजे असे सांगताना आठवले म्हणाले, की देशामध्ये बुद्ध मंदिरे, गुरूद्वारा, मंदिरे आहेत. मी अयोध्येला जाणार आहे. तेथील हिंदु साधु आणि मुस्लिम मौलांबरोबरही चर्चा करणार आहे. अयोध्येत बुद्धाचे अवषेश मिळाले आहेत. वादग्रस्त जागेवर आमची मागणी नाही. तेथे राष्टीय एकात्मता कशी नांदेल यासाठी माझा प्रयत्न असेल, असे आठवले म्हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत