अयोध्येत शिवसेनेच्या शाखेचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

अयोध्या : रायगड माझा वृत्त 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱयामुळे येथील माहौलच बदलून गेला आहे. मुख्य चौकात, नाक्या-नाक्यावर ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या जात आहेत. आज अयोध्या शहरातील पहिली शिवसेना शाखा स्थापन करण्यात आली. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन झाले.

लक्ष्मण किलानजीक गोलाघाटा येथे उदासीन आश्रमाजवळ ही शिवसेना शाखेची शानदार वास्तू बांधण्यात आली आहे. महंत अनिलकुमार शरण हे येथील पहिले शाखाप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले असून त्यांच्यासह महंत रामचंद्र शरण, महंत अमितकुमार दास, महंत अंजनीकुमार शरण, लल्लन प्रसाद मिश्र, महंत धरमदास या पाच पदाधिकाऱयांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या. लवकरच अयोध्या शहरात शिवसेना सदस्य नोंदणीला सुरुवात होईल, अशी माहितीही अमितकुमार दास यांनी दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत