अरुणाचलमधील प्रत्येक घरात वीज पोहोचली : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

Image result for narendra modi

लोकसभा निवडणूकीचे बिगुल वाजण्याच्याआधी आपल्या दौऱ्यावर निघालेल्या पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी अरुणाचलचा प्रदेशला मोठे गिफ्ट दिले. इथे पंतप्रधान मोदी यांनी एकावेळी दोन विमानतळांचे उद्घाटन केले. विमानतळाचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ईटानगर येथे एक जनसभेला संबोधित केले. आज अरुणाचलमध्ये 4 हजार कोटीहून जास्त रुपयांच्या योजनेचा शिलान्यास आणि लोकार्पण करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे कनेक्टीव्हीटी तर सुधारणार आहेच त्यासोबत राज्याच्या वीज पुरवठ्याला मजबूती येणार आहे. आरोग्य सेवेमध्ये चांगले बदल होतील आणि अरुणाचलच्या संस्कृतीलाही चालना मिळेल.

‘मनाला जोडणारे प्रकल्प’

मी पुन्हा पुन्हा तेच म्हणत आलोय की न्यू इंडिया तेव्हाच पूर्ण शक्तीने विकसित होईल जेव्हा पूर्व भारत, नॉर्थ ईस्टचा वेगाने विकास होईल. हा विकास संसाधनांसोबत संस्कृतीचा देखील असेल. हा विकास वेगवेगळ्या क्षेत्रांना आणि मनाला जोडणारा देखील असेल असे पंतप्रधानांनी सांगितले.

‘सबका साथ सबका विकास’ या नाऱ्या अंतर्गत गेल्या साडे चार वर्षांमध्ये अरुणाचल आणि उत्तर पूर्वच्या विकासासाठी निधी आणि इच्छाशक्तीची कमतरता जाणवू दिली नाही. आजच्या योजनांमुळे अरुणाचसल प्रदेशची कनक्टीव्हीटी तर सुधारणार आहेच पण राज्यातील पॉवर सेक्टरलाही मजबूती मिळणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत