अलिबागच्या समुद्रात महिलेचा बुडून मृत्यू

मुरूड : अमूलकुमार जैन

अलिबाग येथील जिल्हा न्यायालयाच्या मागील बाजूस असणाऱ्या समुद्रातलीना सुरेश मते (वय 35 वर्षे,रा.दादर,मुंबई) बुडून महिलेचा मृत्यू झाला आहे. याबाबत ची फिर्याद मंगेश हरी बिरवाडकर यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात दिली आहे. अलिबाग येथील जिल्हा न्यायालयाच्या मागे असलेल्या समुद्राच्या पाण्यात लीना सुरेश मते ही बुडाल्याने ती बेशुद्ध पडली होती.तिला बेशुद्धावस्थेत अधिक उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील अपघात विभागात  नेण्यात आले.त्यावेळी तिची तपासणी करून ती मृत झाली असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले. याबाबतचा तपास पोलीस उप निरीक्षक संतोष भिसे हे करीत आहेत.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत