अलिबागमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा आत्महत्येचा प्रयत्न

अलिबाग : रायगड माझा वृत्त 

अलिबागमधील आक्षी येथे एकाच कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी घडली. पाचही जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील दोन लहान मुलांची प्रकृती चिंताजनक आहे.

अलिबागमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा आत्महत्येचा प्रयत्न

अलिबाग तालुक्यातील आक्षी येथे राहणाऱ्या एकाच कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांनी शितपेयातून विष घेतल्याचा संशय आहे. यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. आजी- आजोबा, मुलाची पत्नी आणि त्याची दीड वर्षांची जुळी मुले अशा पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलगा हा मुंबईत नोकरीला असून हे वृत्त समजताच तो अलिबागला रवाना झाला आहे. चौघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी ते बेशुद्धावस्थेत होते. कौटुंबिक वादातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, असे समजते. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

रामचंद्र पाटील (वय ६०), रंजना पाटील (वय ५०), कविता राहुल पाटील पाटील (वय २५), स्वराली पाटील (दीड वर्षे)  आणि स्वराज पाटील (दीड वर्षे)  अशी त्यांची नावे आहेत. यातील स्वराली आणि स्वराज या दोघांची प्रकृती गंभीर असून दोघांनाही मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत