अलिबागमध्ये ओव्हरटेक करताना शिवशाही आणि एसटी बसची धडक

अलिबाग : रायगड माझा वृत्त

अलिबागमधील कार्लेखिंड येथे ‘शिवशाही’ बसने विरुद्ध दिशेने येणाऱ्या एसटी बसला धडक दिल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या घटनेत १५ प्रवासी जखमी झाले असून एसटी बसचालकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अलिबागमध्ये ओव्हरटेक करताना शिवशाही आणि एसटी बसची धडक

राज्य परिवहन महामंडळाची ‘शिवशाही’ बस मुरुडवरुन स्वारगेटला जात होती. तर एसटी बस पनवेलवरुन अलिबागला येत होती. कार्लेखिंड येथे ओव्हरटेक करताना शिवशाही बसने विरुद्ध दिशेने येणाऱ्या एसटी बसला धडक दिली. या अपघातात ४० ते ५० जण जखमी झाले असून जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातात एसटी चालक के एस लहाने गंभीर जखमी झाले असून त्यांना मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

दरम्यान, एसटी बसचा अपघात झाल्याची ही आठवडाभरातील तिसरी घटना आहे.२१ जून रोजी ठाणे शहरतील सॅटिस पुलावर दोन एसटी बसची धडक झाल्याने २८ प्रवासी जखमी झाले होते. तर त्याच दिवशी रात्री नवी मुंबईतील सानपाड्याजवळ दुचाकीस्वाराला वाचवताना एसटीच्या शिवनेरी बसचा अपघात झाला होता. यात ५ प्रवासी किरकोळ जखमी झाले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत