अलिबागमध्ये सतत होतोय अनियमित विद्युत पुरवठा; महावितरण विरोधात शिवसेना आक्रमक

रेवदंडा : मिथुन वैद्य 

अलिबाग तालुक्यात गेले काही महिने होणारा विद्युत पुरवठा हा अनियमित होत आहे. त्यामुळे अलिबाग तालुक्यातील ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली आहे. या अनियमित विद्युत पुरवठ्यावर आवाज उठविण्यासाठी अलिबाग मधील शिवसेना आक्रमक झाली आहे. त्यांनी सतत होणाऱ्या वीज पुरवठा खंडित होणेबाबत अलिबाग मधील महावितरण कार्यालयाला निवेदन दिले. यावेळी महावितरणाचे अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांनी वीज पुरवठा नियमित करण्याबाबतचे निवदेन कर्मचाऱ्याकडे दिले. दरम्यान अनियमित विद्युत पुरवठा करणेबाबत महावितानाच्या कर्मचाऱ्याला पेटता दिवा देवून निषेध केला. यावेळी शिवसेनचे रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, शिवसेना नेते महेंद्र दळवी, विजय कवळे, राजा केणी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत