अलिबाग जिल्हा रुग्णालय समस्यांच्या विळख्यात !

शांतात कमिटीचे तर्फे लक्षवेधी उपोषण!

अलिबाग : मिथुन वैद्य

अलिबाग येथील रायगड जिल्हा रुग्णालतील अनेक त्रुटींविरोधात शांतात कमिटीच्या सदस्यांतर्फे लक्षवेधी उपोषण पुकारण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा रुग्णालयात असलेले वैद्यकिय कर्मचाऱ्याची रिक्तपदे त्वरित भरण्यात यावीत तसेच सामन्य जिल्ह्य रुग्णालयातील इमारतीची झालेली दुरवस्था, त्याबरोबर अलिबाग जिल्हा रुग्णालयाला अत्यंत आवश्यक असणारी नर्सिंग प्रशिक्षण इमारत ही पूर्णतः जीर्ण झालेली आहे. येथे शिकणारे विद्यार्थी पडझड झालेल्या इमारतीतच जिवमुठीत घेउन नर्सिंगचे शिक्षण घेत आहेत. इतकी दयनीय अवस्था नर्सिंग प्रशिक्षण घेणाऱ्या इमारतीची झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.

त्याच बरोबर गेल्या अनेक दिवसान पासून रुग्णालयातील नेत्रविभाग बंद अवस्थेत आहे. परीणामी मोतीबिंदू सारख्या शस्त्रक्रिया ही बंद आहेत. याचा नाहक मनस्ताप जिल्ह्याभरातुन येणाऱ्या रुग्णांना सोसावा लागत आहे. तसेच बालरोग चिकित्सा कक्ष, पोषण पुनर्वसन केंद्रात ही अनेक समस्यांच्या विळख्यात असून येथील इमारतीत डागडुजी करणे गरजेचे आहे. त्यामुळे एकंदरीतच जिल्हा सामन्य रुग्णालय समस्यांच्या विळख्यात अडकले असून, याबाबत प्रशासनाने गांभीर्याने दखल घेणे जरुरीचे झाले आहे. अशा अनेक मुद्यांबाबत शांतता कमिटीचे सदस्य नौशाद अकबरली पटेल यांनी लक्षवेंधी उपोषण पुकारले होते.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत