अलिबाग तालुक्यातील चौल भाट्टगल्ली येथील महिलांनी वृक्षरोपण करत अनोख्या पद्धतीने साजरी केली वटपौर्णिमा 

अलिबाग : मिथुन वैद्य

अलिबाग तालुक्यातील चौल भाट्टगल्ली येथील महिलांनी अनोख्या पध्दतीने वटपौर्णिमा साजरी केली. कोरोनाचे संकट अजूनही  कायम आहे. आशा वेळी तसेच अनेक महिला नोकरी व्यवसाय निमित्त कुटंबाला हातभार लावण्या साठी घरा बाहेर जातात त्यातच परंपरा कायम ठेवण्याकरता अनेक महिला वडाच्या झाडांची फंदी आणून पूजन करतात. मात्र यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते, मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास होतो. याबाबी लक्षात घेत अलिबाग तालुक्यातील चौल येथील महिलांनी कोरोनाचे नियम पाळून चौल परिसरातील डोंगराळ भागत ८० हून आधिक विविध प्रकारच्या वृक्षाची लागवड करून एक प्रकारे अनोखा उपक्रम राबविला. सोबत पर्यावरणाचे संतुलन राखण्याचा प्रयत्न देखील केला आहे. वटपौर्णिमा निमित्त चौल भाट्टगल्ली येथील महिलांनी वृक्षरोपण करत सामजिक संदेश दिला असून या प्रसंगीं परिसरातील महिलांनी सहभाग दर्शवला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत