अलिबाग तालुक्यात प्लास्टिक बंदीचे उल्लंघन

रेवदंडा – मिथुन वैद्य

महाराष्ट्रात सर्वत्र प्लास्टिक बंदी असून देखील रायगड जिल्ह्यातील जिल्ह्याचे मुख्यालय पर्यटन दृष्ट्या हीं प्रसिद्ध असलेले ठिकाण अर्थात अलिबाग मध्ये मात्र म्हणावी तशी प्लास्टिक बंदी दिसत नाही.तालुक्यातील गावा गावातील अनेक बाजर पेठान मध्ये किरकोळ विक्रेत्यान पासून ते अगदी घाऊक विक्रेत्यान पर्यत सर्वच स्थावर प्लास्टिक पिशव्या नजरेत पडत आहेत. खरेदीदार खुलेआम प्लास्टिक पिशव्याचा वापर करत आहेत.रस्तोरस्ती डंपिंगच्या ठिकाणी प्लास्टिक पिशव्याचे वगळावादी प्रदर्शन पाहीला मिळत आहे. पर्यावरण संतुलना करता केलेली प्लास्टिक बंदी हीं तालुक्यात सुरुवातीस यशस्वी ठरत होती.आता मात्र प्लास्टिक पिशव्या बाजार पेठन मध्ये दिसू लागल्या आहेत. कालांतराने पुन्हा प्लास्टिक पिशव्याचा खुलेआम वापर होईला वेळ लागणार नाही. त्याआधी प्रशासनाने योग्य दखल घेणे गरजेचे झाले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत