अलिबाग-मुरुड समुद्रकिनारी असलेल्या अनाधिकृत बंगल्यावर महिनाभरात कारवाई – पर्यावरणमंत्री रामदास कदम

मुंबई: रायगड माझा 

अलिबाग आणि मुरुड परिसरातील समुद्रकिनारी असलेल्या अनाधिकृत बंगले, फार्महाऊसवर महिनाभरात कारवाई केली जाईल, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मंत्रालयात सांगितले. रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी असलेल्या अनधिकृत बंगल्याबाबत आढावा बैठक आज मंत्रालयात झाली. यावेळी श्री. कदम बोलत होते.

श्री. कदम म्हणाले, अलिबाग मध्ये 145 तर मुरुडमध्ये 167 बंगले अनधिकृत आहेत. त्यात अलिबाग मधील 60 बंगले हे स्थानिक नागरिकांचे तर मुरुडमधील 50 बंगले हे स्थानिक रहिवाशांचे आहेत. एकूण अनधिकृत बंगल्या पैकी अलिबाग मधील 61 आणि मुरुड मधील 101 बंगल्यावर न्यायालयाने स्थगिती दिली आहे. हे अनधिकृत बंगले, फार्महाऊस उद्योगपती, सिनेमा सृष्टीतील कलावंतांचे आहेत. दोषी बंगला धारकांना 1 लाख रुपये दंड आणि 5 वर्षाची कारावासाची शिक्षा होऊ शकते. महिनाभरात सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल असे ही श्री. रामदास कदम यांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत