अलिबाग व रायगड जिल्ह्यात  सेक्स रॅकेट चालविणाऱ्या इंटरनॅशनल रॅकेटचा  पर्दाफाश

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई 

अलिबाग : रायगड माझा 
अलिबाग शहर व रायगड जिल्हात भारतीय तसेच परदेशी कॉलगर्ल 24/7 पुरविल्या
जातात अशा विविध जाहिराती शोषल मिडीया व इंटरनेटद्वारे प्रसारित केल्या जात असल्याने
संबंधितान विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे मा.पोलीस अधीक्षक श्री.अनिल पारस्कर यांनी
स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक जे.ए.शेख यांना आदेशित केले होते.
त्यानुसार इंटरनेट द्वारे प्रसारित केल्या जाणा-या सर्व जाहिरातींचा गुगल सर्च इंजिनद्वारे
शोध घेण्यात आला व त्यातील जाहिरातींमध्ये दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करता, त्या
साबंधीताने आय.सी.आय.सी.आय बॅन्केचे एक खाते क्रमांक दिला व त्यात रक्कम भरण्यास
सांगितले त्याप्रमाणे रक्कम भरल्यानंतर त्या व्यक्तीने दिनांक 24/07/2018 रोजी अलिबाग
येथील हॉतेलात 3 परदेशी सुंदर कॉलगर्लना एका इसमा सोबत पाठऊन दिले. ठरल्या प्रमाणे
रूम बुक करून त्या कोर्लगर्लना ठरले प्रमाणे पोलिसांचे तीन बोगस कस्टमर यांनी रक्कम दिल्या
नंतर त्यांनी समोरील व्यकतीस मोबाईल द्वारे रक्कम रिसीव्ह झाल्याचे कळविले, त्यानंतर तिन्ही
परदेशी कॉर्लगर्ल्सनी रुममध्ये प्रवेश केला. बोगस कस्टमरने व्यवहार झाल्यानंतर व इशारा
केल्यानंतर पोलिसांनी पंचांसह रुम मध्ये प्रवेश केला. त्याप्रमाणे दोन पंचानसमक्ष सापळा पूर्व
पंचनामा करण्यात आला व त्यांनतर सदर तीन कोर्लगर्लस कडून रक्कम हस्तगत करण्यात आली.
सदर कॉलगर्लस यांना घेऊन येणा-या इसमास अटक करून पुढील तपास करता त्यांनी
कॉलगर्लना वाहतूक करण्या-या इतर दोन साथीदारांची व ज्यांनी कॉलगर्लस पुरविल्या आहेत,
त्या महिलेची माहिती सादर केली. त्याप्रमाणे संबंधित 2 इसम व 1 महिला यांना गुन्ह्यात
अटक करण्यात आली. सदर कॉलगर्लस पुरविणाऱ्या महिलेच्या बांद्रा येथील राहते फ्ल्याट मधे
2 परदेशी कॉलगर्लस मिळून आल्या अशा 5 परदेशी कॉलगर्लस ताब्यात घेऊन त्यांची महिला
सुधारगृहात दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून अटक केलेल्या आरोपीन विरुद्ध अलिबाग
पोलीस ठाणे येथे कॉ.गु.र.न. 104/2018, लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1956 चे
कलम 4, 5, 6 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 67, 67 (अ) अन्वये गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. तसेच कॉलगर्लस ची वाहतूक केल्याने निष्पन्न झाल्याने सदर
गुन्हयास भा.द.वि.स.कलम 370 (3) हे वाढीव कलम लावण्यात आले आहे. त्याचप्रमाणे
इंटरनेट व्यवहार करून पैसे स्वीकारणारे व त्यांना मदत करणारे इतर साथीदारांचा शोध सुरु
आहे.
सदर ताब्यात घेतलेल्या 5 महिला या कोलंम्बिया, दक्षिण अमेरिका या देशातील
रहिवाशी असून टूरीस्ट व्हिसाद्वारे त्या भारतात आल्या आहेत. संबंधित अटक केलेल्या दलाल
आरोपी महिला व इतरांनी त्यांना बेंगलोर, दिल्ली, पुणे, चांधीगड, हैदराबाद, अलिबाग
इत्यादी ठिकाणी पाठून त्यांचेकडून वेशाव्यवसाय करून घेतल्याची कबुली दिली. आहे. ऑन
लाईन संपर्क झाल्यानंतर बैंककेच्या अकौंट मध्ये भरली जाणारी रक्कम दलाल काढून घेत व
ग्राहकांकडे पाठीविल्यानंतर त्यांच्याकडून मिळणा-या रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम दलालांना
परदेशी महिलांद्वारे मिळत असे. सदर परदेशी महिलांच्या पासपोर्ट व व्हिसा यांची पडताळणी
करण्यात येत आहे.
मा. पोलीस अधीक्षक श्री.अनिल पारस्कर सो, यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शना नुसार, अपर
पोलीस अधीक्षक श्री.संजय पाटील सो यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे
पोलीस निरीक्षक श्री. जे.ए.शेख, सपोनि श्री.सस्ते, श्री.पवार, पोऊनिश्री.वळसंग आणि पोलीस
स्टाफ यांनी यशस्वी कारवाई पार पाडली आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत