अल्पवयीन मुलाचा मृत्यू ,आत्महत्येचं नाटक चागंलच पडलं महागात

उत्तर प्रदेश | बाराबंकी : रायगड माझा वृत्त 

एका अल्पवयीन मुलाला आत्महत्येचं नाटक चागंलच महागात पडलं आहे. मुलाच्या शेजारच्या एका व्यक्तीने फाशी घेवून आत्महत्या केली होती. हे बघून त्या अल्पवयीन मुलाने घरी येऊन आत्महत्येचं नाटक केलं. त्यातच त्याला स्वत:चा जीव गमवावा लागला आहे. बलराम असं या तरुणाचं नाव असून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता.

उत्तर प्रदेश मधील बाराबंकीच्या रामनगर येथे सहारा इंडियाचे एजेंट संदीप मौर्य यांनी फाशी घेउन आत्महत्या केली होती. संदीपने आपल्या वयक्तिक कारणांमुळे आत्महत्या केली होती. बलरामने घडलेली घटना पाहण्यासाठी गेला होता. घरी परतल्यावर तो फाशीचे नाटक करत होता. त्याने घराच्या बाहेरील छतावर रुमाल गळ्याला बांधला आणि खाली उडी मारली. त्यावेळी रुमाल गळ्यात आडकला आणि त्याचा जीव गेला. काहीवेळाने लोकांनी त्याला लटकलेले पाहिले परंतू तोपर्यंत त्याचा जीव गेला होता.

ही घटना घडली तेव्हा घरी कोणीही नव्हतं. घडलेला प्रकार कळताच कुटुंबीयांना धक्का बसला. दरम्यान पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत