अल्पवयीन मुलींना पॉर्न दाखवणारा गजाआड

नवी मुंबई : रायगड माझा वृत्त
दोन अल्पवयीन मुलींला जबरदस्तीने अश्लील व्हिडिओ क्लिप दाखवण्याच्या आरोपाखाली एका २९ वर्षीय व्यक्तीला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. विकेश चौहान असे आरोपीचे नाव असून तो तळोजा येथे एका खासगी कंपनीत काम करतो.
विकेश याने या दोन अल्पवयीन मुलींना वेगवेगळ्या वेळेला आपल्या मोबाइल फोनमधील अश्लील व्हिडिओ क्लिप दाखवण्याचा प्रयत्न केला. याबाबत उपलब्ध झालेल्या सीसीटीव्ही फूटेज आणि मोबाइल लोकेशनच्या पुराव्यांचा आधार घेत पोलिसांनी लोकेशला अटक केली.
अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या या आरोपीचे रेखाचित्र काढून नंतर मोबाइल टॉवरच्या माध्यमातून मोबाइल फोनचा शोध घेतल्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील तरमळे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले. मोबाइल फोनचे लोकेशन समजल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत