अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

दिघी सागरी पोलिसांकडून आरोपीला तत्काळ अटक

श्रीकांत शेलार – दांडगुरी
श्रीवर्धन तालुक्यातील वडवली गावात अल्पवयीन मुलीची छेडछाड काढल्याची घटना घडली. याबाबत दिघी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.
याबाबत सविस्तर  मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर घटना अशी की, मूळचा बिहार येथील असलेल्या आरोपी जमिरूद्दिन ईमाममुद्दिन अन्सारी (वय – 55) याचे वडवली गावात बेकरी चे दुकान आहे.  घटनेच्या दिवशी पिडीत मुलगी (वय 13) ही  आरोपीच्या दुकानात चॉकलेट आणण्यासाठी  गेली असता अन्सारी याने  मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असताना दुकानात कुणी नसल्याने तीचे हात पकडून दुकानाच्या आत नेऊन तिच्या  मनात  तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.सदर घटनेची माहिती मिळताच, वडवळी ग्रामस्थांच्या निदर्शनास हे आल्या नंतर तरुणांनी आरोपीला चांगलाच चोप दिला. पिडीत  मुलीने सोमवारी, ता 9 रोजी  दुपारी 3.30 च्या सुमारास  दिघी सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दिघी सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक  निरीक्षक  धर्मराज सोनके हे आपल्या कर्मचाऱ्यांसह  घटनास्थळी जाऊन माहिती घेऊन आले.
फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी अन्सारी याच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम 354 (ब) नुसार, लैंगिक अपराधपासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8 व 12 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अन्सारी ला अटक केली असून गुन्ह्याचा अधिक तपास सहा पोलिस निरीक्षक धर्मराज सोनके हे करत आहेत.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत