अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून लग्नाचा बनाव

सातारा : रायगड माझा वृत्त 

शहरालगत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्याबरोबर लग्न केल्याचे भासवल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, १७ वर्षीय मुलगी घरात एकटी असताना गणेश सुभाष जाधव (वय २२, रा. सैदापूर, ता. सातारा) याने प्रवेश केला. आतून दाराची कडी लावून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर गणेशचे वडील सुभाष जाधव, अंबिका सुभाष जाधव (दोघे रा. सैदापूर), शालन दीपक पवार, सुनील दीपक पवार (दोघे रा. करंजे) यांनी १० जुलै रोजी कोंडवे येथील शंकराच्या मंदिरात लग्न केल्याचे भासवले.

दुसºया दिवशी परत तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. तसेच काही दिवसांनी चारित्र्याच्या संशयाने शिवीगाळ व मारहाण केली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक गिते करीत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत