अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या

भिवंडी : रायगड माझा वृत्त 

घरात एकटी असल्याचे बघून शेजाऱ्यानेच १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना शुक्रवारी भिवंडी येथे घडली.

मुलीचे आई-वडील यावेळी कामाला गेले होते तर मोठी बहीण शाळेमध्ये होती. सकाळच्या सत्रातील शाळा संपवून आलेली १४ वर्षीय मुलगी घरात एकटी होती. याचा फायदा घेत शेजारी राहणाऱ्या तरुणाने बलात्कार करून तिची हत्या केली. शाळेत गेलेली बहीण संध्याकाळी घरी आल्यानंतर हा प्रकार उघड झाला. मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शेजारी राहणाऱ्या राहुल दुधावले (२४) या तरुणाने बलात्कार करून मुलीचा गळा दाबला आणि पाण्याच्या टबमध्ये तोंड बुडवून तिची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. राहुल याने या प्रकरणाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला २९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत