अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पॉक्सो अंतर्गत गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळली

मुंबई : रायगड माझा वृत्त

नोकरीचे आमिष दाखवून 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱया नराधमाला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. आपल्यावर पॉक्सो अंतर्गत दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करावा, या मागणीसाठी हायकोर्टात आरोपीने दाखल केलेली याचिका न्यायमूर्ती ए.एम. बदर यांनी फेटाळून लावली.

नाशिक येथील दिंडोरी तालुक्यात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला नोकरीचे आमिष दाखवून लक्ष्मण गांगुर्डे याने पळवून नेले तसेच तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणाची माहिती पीडित मुलीने आपल्या पालकांना दिली. मुलीच्या पालकांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली त्यानंतर पोलिसांनी लक्ष्मण गांगुर्डे याला ताब्यात घेत पॉक्सो अंतर्गत त्याच्यावर गुन्हे दाखल केले. नाशिकमधील सत्र न्यायालयाने या घटनेची गंभीर दखल घेत 30 हजारांचा दंड व 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. सत्र न्यायालयाच्या निकालाला आव्हान देत सदर आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायमूर्ती ए.एम. बदर यांनी या प्रकरणी सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवत आरोपीला दिलासा देण्यास नकार दिला व त्याची याचिका फेटाळून लावली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत