अल्पवयीन मुलीवर 18 नराधमांनी वर्षभर केला बलात्कार

कन्नूर : रायगड माझा ऑनलाईन 

केरळमध्ये एका १५ वर्षाच्या मुलीवर तब्बल १८ जणांनी वर्षभर बलात्कार केला आहे. या प्रकरणी आतापर्यंत ८ जणांना अटक केली आहे. पीडित मुलीची गुन्हेगाराने सोशल मीडियावरून ओळख वाढवली आणि मैत्री करून तिच्यावर अत्याचार केले.

पीडित मुलगी १०वीची विद्यार्थिनी असून पोलिसांनी १८ आरोपींची ओळख पटवली आहे. पीडित मुलीने दिलेल्या माहितीनुसार सोशल मीडियावर एका तरुणाची आणि तिची ओळख झाली. नंतर तरुणाने तिला एका लॉजमध्ये बोलवले आणि तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिची अश्लील चित्रफित बनवून तिला ब्लॅकमेल केले. अटक केलेल्या आरोपींपैकी एक पीडितेचा नातेवाईक आहे.

आरोपीने अश्लील चित्रफीत पीडित मुलीच्या भावाला दाखवून त्याच्याकडून पैसे उकळण्याचाही प्रयत्न केला. जेव्हा भावाने आपल्या बहीणीकडे चौकशी केली तेव्हा तिने झालेला प्रकार सांगितला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लॉजच्या मॅनेजरलाही अटक करण्यात आली. त्याला सर्व गोष्टी माहित असून त्याने पोलिसांना न कळवल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली आहे. सध्या पोक्सो अंतर्ग गुन्हा दाखल केला असून आठ जणांना अटक करण्यात आली आहे व इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत