अवयव दान संकल्पना राबविण्यात कोदिवले माघी गणेशोत्सव मंडळ कर्जतमध्ये प्रथम   

(नेरळ – कांता हाबळे )

उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिल्यास त्यातून समाज प्रबोधन घडतं व हाच विचार कोदिवले येथील माघी गणेशोत्सव मंडळांने अवयवदान ही संकल्पना राबवत सर्वाॅसमोर एक आदर्श घालून दिला आहे. येथील ३०हून अधिक युवा तरूण व ग्रामस्थांनी यावेळी स्वता अवयवदानाचा संकल्प करत इतरांनाही आवाहन केले आहे. यावेळी अवयवदान संदर्भात माहिती देण्यासाठी झेडटीसीसीतर्फे प्रकाश सैंदाने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन, अवयवदानाविषयी उत्तम माहिती दिली.
यावेळी प्रकाश सैंदाने यांनी मंडळांने घेतलेल्या उपक्रमाच कौतुक तर केलच शिवाय कर्जत तालुक्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने युवा तसेच नागरीक अवयवदानाचा संकल्प करत असल्याचे दिसून आहे. आज अवयव प्रत्यारेपणाची आवश्यकता दिवसेंदिवस वाढत असून दात्यांची संख्या मात्र खुप कमी आहे. अवयवदान हा विषय घराघरात पोहचावा यासाठी या मंडळान् पुढाकार घेऊन तालुक्यात अधिकाधिक ठिकाणी हा कार्यक्रम राबवावा असे मत जिल्हा परिषद सदस्य सुदाम पेमारे यांनी व्यक्त केले. यावेळी गावातील नागरिक व तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतात सध्या ५ लाख रूग्ण विविध विविध अवयवांच्या प्रतिक्षेत आहेत. हा आकडा दिवसेंदिवस वाढत असून मरणोत्तर अवयव प्रमाण खूप कमी आहे. हे प्रमाण वाढण्यासाठी अवयवदान संदर्भात जनजागृती होणे अपेक्षित आहे. मागच्याच वर्षी ४८ वर्षांनी महाराष्ट्रात पहिलं यशस्वी  हदयप्रत्यारोपण झालं. अवयवदानाविषयी असलेलं अज्ञान जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत हे प्रमाण वाढणे अवघड आहे. म्हणून आमच्यासारख्या युवा तरूणांनी पुढे येऊन याबद्दल सर्वांना जागृत करणे आवश्यकता आहे.
अवयव प्रत्यारोपणाबाबत सध्याचं देशांतील चित्र खालील प्रमाणे….
दृष्टीदोषाने त्रस्त असलेल्या साधारणता २ लाख लोकांना नेत्रदानाची आवश्यकता, परंतू दरवर्षी फक्त ५० हजार रूग्णांचाच नेत्रदानातून दृष्टीदोष दूर होत आहे. उर्वरीत रूग्ण प्रतिक्षेतच
​किडनी प्रत्यारोपणासाठी २१हजार रूग्ण प्रतिक्षेत – फक्त ५ हजार रूग्णांनाच दाते उपलब्ध होत आहेत
५ हजार हदयविकारग्रस्त प्रतिक्षेत – फक्त ७० रूग्णांनाच वर्षभरात हदय उपलब्ध होत आहे
२ लाख रूग्णांना यकृतरोपणाची आवश्यकता असून फक्त ७५० रूग्णांना यकृत उपलब्ध होत आहे
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत