अविश्वास ठराव : शिवसेना तटस्थ राहणार

नवी दिल्ली :रायगड माझा 

मोदी सरकारच्या विरुध्द आज लोकसभेत अविश्वास ठरावावर मतदान होणार आहे. सरकारकडून विजयाचा दावा केला जात आहे. तर सरकारविरोधातली नाराजी विरोधक सर्वांसमोर आणणार आहे. यामध्ये शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु शिवसेनेने मतदान न करता तटस्थ राहणार असल्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेना सरकार सोबत राहणार आहे. मात्र अविश्वास ठरावाबद्दल सरकारला मतदान करणार नसून तटस्थ राहण्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे. तर शिवसेनेचे खासदार सभागृहातच जाणार नसल्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

दरम्यान, याआधीच शिवसेनेने भाजपविरोधी भूमिका सामना संपादकीयमधून मांडली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत