अवैध शस्त्र पिस्टल विक्री करीता बाळगणारा गुन्हेगार जेरबंद ,पनवेल तालुका पोलीस पथकाची धाडसी कारवाई

पनवेल : साहिल रेळेकर

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत मा. पोलीस आयुक्त संजय कुमार, मा. सह पोलीस संजयकुमार मेकला, मा. पोलीस उप आयुक्त अशोक दुधे, मा. सहा.पोलीस आयुक्त श्री रविंद्र गिड्डे यांनी केलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे सर्व प्रकारचे अवैध शस्त्र बाळगणारे गुन्हेगार यांचा शोध घेउन कठोर कारवाई करण्याबाबत सुचना देण्यात आल्या होत्या.

त्या अनुषंगाने पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक राजपुत व त्यांचे पथक पोलीस निरीक्षक सतिश जाधव (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, विजय खेडकर, पोहवा विष्णु डुबल, पोहवा मंगेश महाडीक, पोशि प्रशांत कारंजकर, पोना अमोल कांबळे, पोना राकेश मोकल, पोशि संदिप चौधरी, पोशि संतोष पाटील यांनी सखोल माहीती काढून खात्रीशीर मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने दिनांक २८ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास मुंबई पुणे हायवेवर सापळा लावला असता रायगड पेट्रोलपंपाच्या समोर 6 वाजताच्या सुमारास मिळालेल्या बातमीनुसार एक इसम संशयीत हालचाली करताना मिळाला असता त्यास वरील पथकाने शिताफिने ताब्यात घेवुन त्याच्या पाठीवर असलेली सॅक बॅगची झडती घेतली असता त्यामध्ये दोन पिस्टल मॅगझीनसह हे अग्नीशस्त्र विना परवाना, बेकायदेशीररित्या विक्रीकरीता बाळगताना सापडले.

सदर इसम आरोपी वय २२ वर्षे, रा. हिरानंदानी कंम्पाउंडच्या बाजूच्या झोपडपट्टीत मानखुर्द रेल्वे स्टेशन जवळ वास्तव्यास होता. आरोपीचे मुळगांव माधवपुर छतोना, पो. उघडपुर, ता. जयसिंगपुर, जि. कादीपुर, राज्य उत्तर प्रदेश असून यास ताब्यात घेवुन त्याचे विरूध्द पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. ३५/२०१९ भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ तसेच मुबंई पोलीस कायदा कलम ३७ (१) १३५ प्रमाणे दाखल करण्यात आला असुन त्याला अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीचे कोणी साथीदार आहेत का? व त्याने यापुर्वी काही शस्त्रे अन्य ठिकाणी विक्री केली आहेत का? याबाबत सखोल तपास पनवेल तालुका पोलीस यंत्रणा करीत आहे.

सदर कामगिरी बाबत मा. पोलीस आयुक्त संजय कुमार साहेब, मा. सह पोलीस आयुक्त डॉ. सुरेशकुमार मेकला साहेब, मा. पोलीस उप आयुक्त अशोक दुधे साहेब, मा. सहा. पोलीस आयुक्त रविंद्र गिड्डे साहेब यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत