अशोक गहलोत यांनी घेतली राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात काँग्रेसकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होणार आहे. देशभरातील दिग्गज नेते या सोहळ्याला हजेरी लावतील. मोठ्या कालावधीनंतर मिळालेल्या यशामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

अशोक गहलोत यांनी घेतली राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

भोपाळ : रायगड माझा वृत्त 

अशोक गहलोत यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. गहलोत यांचा शपथविधी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पार पडला. राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळाली होती. अनुभवी अशोक गहलोत यांना संधी मिळणार की युवा सचिन पायलट बाजी मारणार, याची उत्सुकता होती. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अखेर गहलोत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.

एकीकडे काँग्रेसचे मुख्यमंत्री शपथ घेत असताना दुसरीकडे शीखविरोधी दंगलीत सज्जन कुमार या काँग्रेस नेत्याला दोषी ठरवण्यात आलं आहे. 1984 शीख दंगलप्रकरणी दिल्ली हायकोर्टाने सज्जम कुमारला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

कमलनाथ होणार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री

मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. केंद्रीय मंत्रिपदाचा मोठा अनुभव असलेले कमलनाथ आता मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळतील. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने 15 वर्षांनंतर भाजपला पराभूत केलं आहे.

भूपेश बघेल हे छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. दुपारी साडेचार वाजता त्यांचा शपथविधी होईल. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने भाजपची 15 वर्षांची सत्ता उलथवत एकहाती विजय मिळवला आहे. सत्ता मिळवल्यानंतर काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाची संधी कुणाला मिळते, याची उत्सुकता लागली होती. काँग्रेसकडून आता भूपेश बघेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

दरम्यान, या तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात काँग्रेसकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होणार आहे. देशभरातील दिग्गज नेते या सोहळ्याला हजेरी लावतील. मोठ्या कालावधीनंतर मिळालेल्या यशामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत