अस्टमी येथे आढळला 6 फुटी अजगर ,सर्पमित्रांने दिले अजगराला जीवदान ! 

कोलाड : कल्पेश पवार 

रोहे तालुक्यातील अस्टमी कुंडलिका पुलांनजीक शनिवारी दुपारच्या सुमारास दुर्मिळ होत चाललेले सहा फुटी अजगर आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती .परंतु गावातील काही जागरूक तरुणांनी सर्पमित्र यांना संपर्क करून बोलावले आणि सर्प मित्राने अजगराला जीवदान दिले असल्याचे समजते आहे.


शनिवारी सकाळ पासूनचं पाऊसाची संतधार सुरू होती,त्यामुळे मोट्या प्रमानात कुंडलिका नदीला पूर आला होता .याचं पाण्याच्या प्रवास सोबत वाहत रोह्यातील कुंडलिका अस्टमी पुलावर सायंकाळी 4 वाजता दुर्मिळ होत चाललेला अजगर कोळीवाडा परिसरातील युवकाना आढळून आला.त्यांनी लगेचच नागरिकांना सतर्क केले, आणि सर्प मित्र यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधला .काही क्षणातच सर्प मित्र घटनास्थळी आले, आणि त्यांनी आपल्या पध्दतीत सहा फुटी अजगराला पकडून जीवदान दिले . 

त्यांनी या अजगराला लगतच्या जंगलात सोडले आहे .या अजगराची लांबी अंदाजे सहा फूट आहे .त्याच्या अंगावर काळे पटे आढळून येत होते. तरी दुर्मिळ होत चाललेल्या अजगराला सर्प मित्र व काही युवकांनी जीवदान दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत