अस्वच्छता बाबतीत हॉटेल धारकांकडून दंडात्मक वसुली!

माथेरान – मुकुंद रांजाणे

स्वच्छतेच्या बाबतीतदोन महिन्यांपूर्वी  अभियानात माथेरानच्या स्थानिकांनी भरीव योगदान दिले होते.त्यानुसार सर्वच नागरिक स्वच्छतेचा मूलमंत्र जपत आहेत. परंतु काही हॉटेल्स धारक स्वच्छतेच्या बाबतीत आजही अपवाद ठरत असल्याने ठराविक भागात घाणीचे साम्राज्य पहावयास मिळत आहे.

याकामी खुद्द नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी १ मे महाराष्ट्र कामगार दिनी बहुतांश हॉटेल्सची आणि त्यांच्या आवाराच्या जागेची पाहणी केली असता हॉटेल साई हीत यांच्या जागेच्या पश्चिमेला असलेल्या श्रीराम मंदिराच्या परिसरात याच हॉटेल्सचा मोठया प्रमाणात प्लास्टिक तसेच बाटल्यांचा खच पडलेलाआढळून आल्यावर ताबडतोब हॉटेल व्यवस्थापक यांना ताकीद देऊन पाच हजार रुपयांची दंडात्मक वसुली केली असून नगरपालिकेची वसुलीची पावती दिली आहे.
अशी आजही अनेक हॉटेल्स आहेत की ज्यांचा कचरा ही मंडळी जंगलात टाकत असतात त्यामुळे याचा इथल्या पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. साई हीत हॉटेल कडून दंडात्मक वसुली केल्यामुळे अन्य हॉटेल्स धारकांचे धाबे दणाणले आहेत तसेच गावात कुठेही कुणीही नागरिकांनी ओला अथवा सुका कचरा आजूबाजूला गटारात टाकल्यास त्यांच्याकडून सुद्धा दंडात्मक वसुली करण्यात येणार आहे.नगराध्यक्षाच्या पारदर्शी कारभारामुळे तसेच सुयोग्य नियोजनामुळे सूज्ञ नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत