अाईला म्हणाले बाय बाय.. नंतर रूममध्ये जाऊन नांदेडच्या उद्याेजकाने स्वत:वर झाडली गोळी

नांदेड: रायगड माझा 

उद्याेजक सुमाेहन कनलगा (५९) यांनी देणेकऱ्यांना कंटाळून राहत्या घरी पिस्तुलातून छातीत गाेळी झाडून अात्महत्या केली. बुधवारी (दि.११) सायंकाळी ६:३० वाजता ही घटना घडली. सुमाेहन यांना काही लाेकांचे पैसे देणे हाेते. त्या व्यक्तींकडून सातत्याने पैशाचा तगादा लावला जात हाेता. याच तणावातून त्यांनी अात्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज अाहे. सुमाेहन यांनी २ पानांचे पत्रही लिहिले अाहे. या पत्रात त्यांनी अनेक देणेकऱ्यांची नावे लिहिली अाहेत. सुमाेहन यांच्या माताेश्री प्रख्यात गायिका अाहेत.

सकाळीच बँकेतून पिस्तूल अाणले, अाईला म्हणाले बाय बाय, रूममध्ये जाऊन स्वत:वर झाडली गोळी

शहरातील विद्यानगर भागात राहणारे उद्याेजक सुमोहन राममोहनराव कनलगा यांनी बुधवारी सायंकाळी सहा वाजता राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या केली. सुमोहन यांच्याजवळ परवाना प्राप्त पिस्तूल आहे. ते आपले पिस्तूल बँकेच्या लाॅकरमध्ये ठेवत असत. बुधवारी सकाळीच त्यांनी लाॅकरमधून पिस्तूल काढून घरी आणले. त्यानंतर त्यांनी सुसाईड नोटही लिहिली. या नोटमध्ये ३-४ जणांची नावे आहेत.

सुमोहन यांच्या आई सीताभाभी या नावाने शहरात प्रसिद्ध आहे. त्या शास्त्रीय गायिका असून त्या गायन क्लासही चालवतात. सायंकाळी त्या तळ मजल्यावर गायन क्लास घेत असताना सुमोहन यांनी बाहेरून आईला आवाज दिला व बाय बाय म्हटले. त्यावेळी ते कुठेतरी बाहेर जात असावेत या विचाराने त्यांनीही त्याकडे विशेष लक्ष दिले नाही. त्यानंतर सुमोहन दुसऱ्या मजल्यावरील बेडरूममध्ये गेले व त्यांनी पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येची बातमी समजताच शहरातील अनेक डॉक्टर, उद्योजक, गायन क्षेत्रातील मंडळी यांनी त्यांच्या विद्यानगरातील घराकडे धाव घेतली. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन पुढील कारवाई सुरू केली. या प्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत