अामदार जाधव नव्या पक्षाच्या तयारीत; मराठा अांदाेलनाच्या व्यासपीठावर घाेषणा

औरंगाबाद : रायगड  माझा

मराठ्यांसह सर्वच समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी नवीन राजकीय पक्षाची मोर्चेबांधणी करत आहोत. एक सक्षम पर्याय यातून देण्याचा मानस आहे,’ अशी माहिती मराठा अारक्षणासाठी राजीनामा दिलेले शिवसेनेचे कन्नडमधील अामदार हर्षवर्धन जाधव यांनी मंगळवारी दिली. क्रांती चाैकात सुरु असलेल्या सकल मराठा माेर्चाच्या ठिय्या अांदाेलनास भेट देऊन जाधव यांनी तिथेच पत्रकार परिषद घेतली. राजीनामा दिल्यानंतर जाधव साेमवारी मुंबईत गेले हाेते. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट नाकारल्याची चर्चा हाेती. या पार्श्वभूमीवर जाधव यांनी नवीन राजकीय माेर्चाची घाेषणा केल्याचे सांगितले जाते. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड त्यांच्यासोबत होते. दरम्यान, मराठा माेर्चाच्या समन्वयकांनी मात्र त्यांच्या या प्रस्तावाला विराेध दर्शवला अाहे.

पत्रकार परिषदेत अामदार जाधव म्हणाले, ‘फडणवीस सरकार मराठा समाजाच्या मागण्यांची विधिमंडळात दखल घेत नाही. त्यामुळेच मराठा आरक्षण लांबणीवर पडले आहे. यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या नेतृत्वात समाज आंदोलन करत आहे. सरकारच्या वेळकाढूपणाचा निषेध करण्यासाठी अापण आमदारकीचा राजीनामा दिला. मंत्रालयासमोर आंदोलन केले. आता अापण स्वतंत्र पक्ष काढण्याचा आम्ही विचार करत आहोत. त्या दृष्टीने मोर्चेबांधणीला वेग अाला अाहे.’

राजकीय हेतू बाहेर ठेवून अांदाेलनात या : काळे
‘मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला आहे. आम्हाला राजकारण अजिबात करायचे नाही. राजकारण्यांनी आपला राजकीय हेतू बाहेर ठेऊन आंदोलनात सहभागी व्हावे. नवीन पक्षाची घोषणा स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन जाहीर करावी. मात्र, सामाजिक, जीवन मरणाच्या प्रश्नांशी संघर्ष करत असलेल्या मराठा बांधवांच्या भावनांशी खेळ खेळू नये, जो कुणी असा प्रयत्न करेल त्याला आमचा कडाडून विरोध राहील,’ अशी ठाम भूमिका मराठा माेर्चाचे रवींद्र काळे पाटील यांनी दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत