अॅट्रॉसिटी कायद्याचा मराठा समाजाकडूनच गैरवापर- रामदास आठवले

पुणे :रायगड माझा 

अॅट्रॉसिटी कायद्याचा मराठा समाजाकडूनच गैरवापर होत आहे, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. ते बारामतीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

गावच्या राजकारणातून मराठा समाजात दोन गट असतात. अनेकदा एका गटाकडून दुसऱ्या गटाला शह देण्यासाठी या कायद्याचा आधार घेतला जातो. दलित समाजाला केस करायला भाग पाडलं जातं, असं आठवले म्हणाले.

दलित समाजाने मराठा समाजाच्या हातातील बाहुलं न बनता खरोखर अन्याय होईल तेव्हाच या कायद्याचा आधार घ्यावा, असंही आठवले यावेळी म्हणाले

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत