अॅमेझॉन, फ्लिपकार्टवर सेल सुरू;विविध वस्तूंवर ८०% पर्यंत सुट

रायगड माझा वृत्त :

मुंबई:
अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांसाठी खूषखबर आहे. या कंपन्यांनी ग्राहकांसाठी आजपासून खास सेल सुरू केला आहे. त्या अंतर्गत ग्राहकांना विविध वस्तूंच्या खरेदीवर ८० टकक्यांपर्यंत सूट मिळणार आहे.

अॅमेझॉनचा सेल २४ तासांचा आहे. आज दुपारी १२ वाजेपासून उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत याचा लाभ ग्राहकांना घेता येईल. तर, फ्लिपकार्टचा सेल १६ जुलै ते १९ जुलैपर्यंत असणार आहे. अॅमेझॉननं ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘अॅमेझॉन प्राइम डे फ्लॅश सेल’चं देखील आयोजन केलं आहे. फ्लॅश सेल १६ जुलैला दुपारी ३ ते ६ पर्यंत आणि १७ जुलैला सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत असणार आहे. ‘शाओमी रेड मी वाय २’ हे या फ्लॅश सेलचं मुख्य आकर्षण असेल.

अॅमेझॉनला टक्कर देण्यासाठी फ्लिपकार्ट १५००हून अधिक स्मार्टफोन्सवर सूट देण्याच्या विचारात आहेत. फ्लिपकार्टच्या गृहपयोगी आणि इलेक्ट्रोनिक वस्तूंवर ७०% सूट मिळणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत