मुंबई: रायगड माझा वृत्त
आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिंपियाड २०१८मध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी नवा इतिहास रचला. स्पर्धेत सहभागी झालेल्या देशाच्या संघातील सर्व ५ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके जिंकण्याची गेल्या २१ वर्षातील ही पहिलीच घटना आहे. भारताचे हे स्पर्धेतील आजवरचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन आहे.
ऑलिंपियाडमध्ये भारताच्या संघाने सर्वोत्तम अशी कामगिरी केली. भारत या स्पर्धेत १९९८पासून सहभागी होत आहे. पण संघातील प्रत्येक खेळाडूने सुवर्णपदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी भारताने ३ वेळा ४ सुवर्ण आणि एक रौप्यपदक मिळवले होते, असे नॅशनल सेंटर होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनमधील अधिकारी प्रविण पाठक यांनी सांगितले.
पोर्तुगलमधील लिस्बन येथे झालेल्या ४९व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिंपियाडमध्ये ८९ देशांनी सहभाग घेता होता. भारत वगळता केवळ चीनच्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक जिंकता आले.