आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटीलांचे नाव देण्यासाठी दि.बा समर्थकाकडून नेरळ ते मानिवली मशाल फेरी.

नेरळ-अजय गायकवाड

                                  नवी मुंबईतील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आज 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी कर्जत तालुक्यातील दि बा पाटील समर्थकांनी नेरळ येथील हुतात्मा चौक ते मानिवली येथील हुतात्मा हिराजी पाटील स्मारक अशी मशाल फेरी काढली.या मशाल फेरीमध्ये शेकडो तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दाखवत हाती मशाल घेऊन 7 किलोमीटर लांबीचा प्रवास दौडत केला.


लोकनेते दि बा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याच्या मागणीसाठी आज 9 ऑगस्ट रोजी कर्जत तालुका दि बा समर्थक यांनी मशाल फेरी काढली.नेरळ येथील हुतात्मा चौकात हुतातम भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या अर्धपुतळ्यांना ग्रामपंचायत सदस्य मंगेश म्हसकर आणि माजी सरपंच शंकर भुसारी यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यावेळी जेष्ठ कार्यकर्ते कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे उपाध्यक्ष केशव मुने,अरुण कराळे,सुरेश गोमारे,विष्णू कालेकर,संजय कराळे,राजेश भगत,भाजप किसान मोर्चा कोकण संघटक सुनील गोगटे,तसेच वांगणी स्थानकात शौर्य गाजविणारा मयूर शेळके,यांच्यासह महिला यांच्या उपस्थितीत मशाल प्रजेवलीत करण्यात आली.यावेळी खाडे भुषण पेमारे,संदिप म्हसकरऋषिकेश भगत,अविनाश चंचे,ओम्कार कराळे,प्रविण शिंगटे,मनिष राणे,सज्जन गवळी,प्रविण डायरे,वैभव भगत,केशव तरे,सुशिल कालेकर,हरेष सोनावळे,अरुण ऐनकर,जयेंद्र कराळे,संतोष धुळे,अनंता भोईर,मंगेश इरमली यांनी आघाडीवर राहून मशालीचे सारथ्य केले.


हुतात्मा चौकातून मशाल फेरी कल्याण रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी हुतात्मा हिराजी पाटील चौकातून निघून नेरळ फाटक येथून माथेरान- नेरळ- कळंब राज्यमार्ग रस्त्याने मानिवली येथील हुतात्मा हिराजी पाटील स्मारकात पोहचली.तेथे मानिवली ग्रामस्थांच्या वतीने दीपक पाटील,जितेंद्र पाटील यांनी मशाल फेरीचे स्वागत केले.मानिवली येथे पोशिर,मानिवली परिसरातील असंख्य तरुण उपस्थित होते.मशाल फेरीने कर्जत तालुक्यात पुन्हा एकदा लोकनेते दि बा पाटील यांच्या नावाच्या हुंकार ऐकायला मिळाला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत