आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट प्रकरणात आणखी एकाला अटक

या प्रकरणातील दोन नंबरचा आरोपी अटकेत

अलिबाग : अलिबागमधील आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटप्रकरणात हुस्नेन राजन उर्फ अली या कोरिग्राफर असलेल्या व्यक्तीस स्थानिक गुन्हे अन्वेक्षणने अटक केली आहे. या आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सेक्स रॅकेटमधील मुख्य असलेली आरोपी लॉरी हिचा शोध स्थानिक गुन्हे अन्वेक्षण विभागाकडून सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यत 5 जणांना अटक करण्यात आली आहे.
अलिबागमधील रेडिसन ब्लु सेव्हन स्टार पंचतारांकित हॉटेलमध्ये आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफार्श स्थानिक गुन्हे अन्वेक्षणने केला होता. यामध्ये 5 कोलगर्ल्स, 1 दलाल, 2 चालक व 1 ट्रॅव्हल्स एजंट याना अटक केले होते. तर या प्रकरणातील हुस्नेन राजन उर्फ अली व लॉरी हे दोन मुख्य आरोपी अजून मोकाट होते. यातील हुस्नेन राजन उर्फ अली याला स्थानिक गुन्हे अन्वेक्षणने अटक केली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेक्षण विभागाने हे रॅकेट उध्वस्त करण्यासाठी सापळा रचला होता. पोलिसांनी गुगल साईटवर असलेल्या हुस्नेन याच्या फोनवर फोन करून कोलगर्ल्स पाठविण्यास सांगितले होते. यासाठी हुस्नेन याच्या आयसीआयसी बँकेत खात्यात पोलिसांनी 99 हजार भरले होते. त्यानंतर कोलगर्ल्स रेडिसन हॉटेल मध्ये आल्या होत्या. उर्वरित पैसे कोलगर्ल्स आल्यानंतर त्यांना देण्यात आले. पैसे भेटल्याचे हुस्नेन राजन उर्फ अली याने मुख्य असलेली आरोपी लॉरीला फोन करून सांगितले. त्यानंतर पोलिसांनी 9 जणांना अटक केली होती. मात्र हुस्नेन राजन उर्फ अली हा फरार होता.
हुस्नेन राजन उर्फ अली हा व्यवसायाने कॉरिग्राफर असून काही हिंदी सिनेमात काम केले असल्याचे त्याने तपासत सांगितले आहे. तसेच तो उत्तम डान्सर असून गायकही आहे. परदेशात त्याचे डान्स व गाण्याचे शो सुरू असतात. लॉरी हिच्या सोबत 2 वर्षांपूर्वी त्याची भेट झाली होती. त्यानंतर हे दोघे आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट सोशल साईट तयार करून चालवीत होते. तर गुगलवरील रायगडच्या सेक्सच्या सोशल साईट ह्या लॉरी हिने बनविलेल्या असल्याचे समजते. तर हुस्नेन राजन उर्फ अली हा ग्राहक शोधत असे. कोलगर्ल्स साठी कँडी ह्या परवलीचा शब्द वापरला जात होता. लॉरी ही परदेशी नागरिक असून ती गोव्यात राहत आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेक्षण विभागाचे पथक गोव्यात तिला पकडण्यासाठी गेले होते. मात्र ती तेथून फरार झाली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेक्षण तिचा शोध घेत आहेत.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत