आंदोलनाच्या भीतीने मुंबईतल्या टोलनाक्यांवर तपासणी, रस्तेवाहतूक विस्कळीत

मुंबई : रायगड माझा वृत्त 

मराठा मोर्चाची संवाद यात्रा, शिक्षकांचा मोर्चा आणि 26/11 हल्ल्याची 10 वर्ष अशा एकूण पार्श्वभूमीवर सरकारने मंबईच्या प्रवेशद्वारांवर असेलल्या टोलनाक्यांवर वाहनांची तपासणी सुरू केली आहे. या तपासणीमुळे वाहनांचा वेग मंदावला असून ठिकठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

ठाण्यातील आनंदनगर टोलनाक्यावर वाहनांची तपासणी सुरू असल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पोलीस प्रत्येक वाहनाची तपासणी करत आहेत. त्यामुळे याभागात अनेक वाहनं खोळंबून राहिली आहेत. वाहन चालक आणि प्रवाशांचे मात्र या वाहतूक कोंडीमुळे प्रचंड हाल होत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत